बंगळुरू – भारतीय हॉकी संघाचा महिला आणि पुरुष संघ टोकियो येथे होत असलेल्या ऑलिम्पिक टेस्ट इव्हेन्ट हॉकी स्पर्धेसाठी रविवारी रवाना झाला असून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरी डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ या स्पर्धेला सामोरे जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघाचे सामने जपान, न्युझीलंड आणि मलेशिया यांच्याशी होणार आहेत. तर, महिला गटाचे सामने ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपान यांच्या विरुद्ध होणार आहेत. यातील पुरुष संघाचा पहिला सामना मलेशिया विरुद्ध होणार आहे तर महिलांचा पहिला सामना जपान विरुद्ध होणार आहे.