नवी दिल्ली – एफआईएच प्रो लीगमधील सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या बेल्जियमला भारताच्या संघाने पराभूत केले. रोमांचक सामन्यात शूटआऊटमध्ये भारतीय संघाने बेल्जियमचा 5-4 च्या फरकाने पराभव केला.
हरमनप्रीत सिंह, जर्मनप्रीत सिंह आणि शमशेर सिंह यांचा भारताच्या विजयात सिंहाचा वाटा राहिला. या तिघांनी मोक्याच्या क्षणी तीन गोल केल्यामुळे सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर शुटआऊटमध्ये भारतीय संघाने 5-4 ने बाजी मारली.
या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली. शमशेर सिंहने 17व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 20व्या मिनिटाला बेल्जियमने गोल करत बरोबरी केली. त्यानंतर 35व्या आणि 50व्या मिनिटाला आणखी गोल करत 3-1च्या फरकाने आघाडी घेतली.
दरम्यान, सामन्याच्या अखेरच्या क्षणी भारतीय संघाने जोरदार प्रतिउत्तर दिले. 51व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंह, तर 57व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंहने गोल करत सामन्यात 3-3ने बरोबरी केली.