टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (FIH) रविवारी रात्री पॅरिस ऑलिम्पिकसाठी पूल (गट) निश्चित केले. ज्यामध्ये भारताचा जागतिक क्रमावारीत दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या आणि गत ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम, टोकियो रौप्यपदक विजेता ऑस्ट्रेलिया आणि रिओ ऑलिम्पिक विजेता अर्जेंटिना या संघासोबत पूल ‘बी’ (ब-गट) मध्ये समावेश करण्यात आला आहे. या पूलमध्ये(pools) न्यूझीलंड आणि आयर्लंड या बलाढ्य संघाचा देखील समावेश आहे.
पुरुष हॉकीमध्ये भारत हा एकमेव आशियाई संघ…
हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाच्या वर नेदरलँड आणि बेल्जियम आहेत. आठ ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणाऱ्या भारताला ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवणे नेहमीच कठीण गेले आहे. अ गटात (पूल ‘ए’) नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका आहेत. आफ्रिका आणि यजमान फ्रान्सला मानांकन देण्यात आले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या 12 संघांमध्ये भारत हा एकमेव आशियाई संघ आहे. दरम्यान, रविवारी ऑलिम्पिक हॉकी पात्रता फेरी संपल्यानंतर एआयएच (FIH : International Hockey Federation) ने पूल वाटप(गट) केले.
Here are the pools for the men’s competition at the @Paris2024 #Olympics.
More details here : https://t.co/oInb4mA6dT#hockey #Paris2024 pic.twitter.com/WTJNXGSyyN
— International Hockey Federation (@FIH_Hockey) January 22, 2024
महिला संघ पात्र मिळवण्यात अपयशी…
रांची येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारतीय महिला हॉकी संघाला पॅरिसचे तिकीट मिळू शकले नाही. कारण संघाला तिसऱ्या-चौथ्या स्थानाच्या सामन्यात जपानकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला.
‘या’ कालावधीत हॉकीचे सामने…
पूल वाटप (गट वाटप) जागतिक क्रमवारीवर आधारित आहे. ऑलिम्पिकमधील दोन्ही पूलमधील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या कालावधीत 27 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत हॉकीचे सामने होणार आहेत.
पाक पुन्हा ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्यात अपयशी…
आठ वेळा ऑलिम्पिक पदक विजेता (तीन सुवर्ण) पाकिस्तानी पुरुष हॉकी संघ पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. ऑलिम्पिक पात्रता फेरीत तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला. यापूर्वी उपांत्य फेरीत जर्मनीकडून 0-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना ऑलिम्पिकची तिकिटे मिळणार होती. पाकिस्तानी संघ ऑलिम्पिकमध्ये नसण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. पाकिस्तानचा संघ 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये शेवटचा खेळला होता, जिथे तो सातव्या स्थानावर राहिला होता.