नवी दिल्ली – ओमान येथे होणाऱ्या बहुप्रतिक्षित ज्युनिअर आशिया कप 2023 साठी भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर झाला आहे. 23 मे ते 1 जून या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. तसेच भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व उत्तम सिंग करणार आहे. मलेशियामध्ये डिसेंबरमध्ये होणाऱ्या FIH ज्युनियर पुरुष विश्वचषक स्पर्धेसाठी ही पात्रता स्पर्धा असणार आहे.
भारताला पाकिस्तान, जपान, थायलंड आणि चीन सह गट अ मध्ये ठेवण्यात आले आहे, तर ब गटात कोरिया, मलेशिया, ओमान, बांगलादेश. आणि उझबेकिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच, ‘पहिल्या स्थनावर राहण्याचा प्रयत्न करणार’ प्रशिक्षक सीआर कुमार यांनी व्यक्त केला विश्वास आहे.
संघ निवडीबद्दल बोलताना प्रशिक्षक सीआर कुमार म्हणाले की, ‘आम्ही दोन स्पर्धान मधून गेलो आहोत, ज्यामुळे खेळाडूंना योग्य कामगिरी करण्यात मदत झाली आहे. SAI, बेंगळुरू येथे वरिष्ठ संघ देखील उपस्थित आहे. त्यांच्याविरुद्धही सामने खेळण्याचा पुरेसा अनुभव आम्हाला मिळाला आहे. संघ देखील मोठ्याप्रमाणात उत्साह आहे. त्यामुळे आम्ही पहिल्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. असं ते म्हणाले.
असा आहे भारतीय हॉकी संघ…
गोलरक्षक – मोहित एचएस आणि हिमवान सिहाग
बचावपटू – शारदानंद तिवारी, रोहित, अमनदीप लाक्रा, अमीर अली, योगंबर रावत
मिडफिल्डर – विष्णुकांत सिंग, राजिंदर सिंग, पूवन्ना सीबी, अमनदीप, सुनीत लाक्रा
फॉरवर्ड – बॉबी सिंग धामी (उपकर्णधार), अरिजित सिंग हुंदल, आदित्य लालगे, उत्तम सिंग (कर्णधार), सुदीप चिरमाको, अंगद बीर सिंग