नवी दिल्ली – भारतीय संघात निवड न झाल्यामुळे व्यथित झालेला भारताचा नवोदित क्रिकेटपटू उन्मुक्त चंद याने निवृत्ती जाहीर करत अमेरिकेकडून खेळणार असल्याचे सांगितल्यामुळे भारतीय क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे.
अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी यावर संमिश्र मते मांडली आहेत. त्याने आणखी थोडा संयम ठेवायला हवा होता. संघातील निवड होण्यासाठी सातत्याने कामगिरी सिद्ध करणे गरजेचे होते.
केवळ युवा स्तरावर सरस कामगिरी केली म्हणून अन्य खेळाडूंप्रमाणे लगेच निवड समिती संधी देणार ही अपेक्षा करणे योग्य नाही. देशांतर्गत तसेच आयपीएल क्रिकेटमध्ये सातत्याने सरस कामगिरी केली असती तर त्याचा विचार निवड समितीने निश्चितच केला असता, अशा शब्दांत अनेकांनी आपली मते मांडली आहेत.