Team India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया ( Team India ) तिरुअनंतपुरमला पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच येथे आला असून सराव करत आहे. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की, हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका संपवून भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा हैदराबाद ते तिरुअनंतपुरम हा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.
हैदराबाद सोडल्यानंतर भारतीय खेळाडू वाटेत मजा करत तिरुअनंतपुरमला पोहोचले. येथे टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांची अफाट गर्दी झाली होती. सुरक्षा बंदोबस्तात खेळाडूंना बसमधून हॉटेलकडे नेण्यात आले. दरम्यान, तिरुअनंतपुरममधील लोकांमध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंची मोठी क्रेझ पाहायला मिळाली.
Hello Thiruvananthapuram 👋
Time for the #INDvSA T20I series. 👍#TeamIndia | @mastercardindia pic.twitter.com/qU5hGSR3Io
— BCCI (@BCCI) September 27, 2022
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहितसह सर्व खेळाडूंचे फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. ( Indian Cricket team Reaches thiruvananthapuram for t20i serise against South Africa ) हॉटेलमध्ये प्रत्येक खेळाडूला टिळा लावून पुष्पहार घालण्यात आला. भारतापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ येथे पोहोचला तेव्हा त्यांचेही याच पद्धतीने स्वागत करण्यात आले होते. आफ्रिकन खेळाडूंचे टिळा लावलेले आणि पुष्पहार घातल्याचे फोटो समोर आले होते.
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.
दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉरकिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रुस्सो, ताबर्सी रुस्सो. ट्रिस्टन स्टब्स.