WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Final 2024 : महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
श्रेयंका पाटील आणि मोलिनक्सच्या शानदार गोलंदाजींच्या जोरावर आरसीबीने दिल्लीचा डाव 18.3 षटकांत 113 धावांवर गुंडाळला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीच्या संघाला शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळ करत आरसीबीच्या गोलंदाजांवर दडपण आणले, मात्र आठवे षटक टाकण्यासाठी आलेली डावखुरी फिरकी गोलंदाज मोलिनक्सने या षटकात शेफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद करून दिल्लीचा डाव खिळखिळा केला.
Innings Break!
A sensational bowling display from @RCBTweets! 👌 👌
4⃣ wickets for @shreyanka_patil
3⃣ wickets for Sophie Molineux
2⃣ wickets for Asha ShobanaCan @DelhiCapitals bounce back? 🤔
Stay Tuned ⌛️
Scorecard ▶https://t.co/g011cfzcFp#TATAWPL | #DCvRCB | #Final pic.twitter.com/xl1YFMHVHA
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 17, 2024
शेफालीचे अर्धशतक हुकले, तिने 27 चेंडूत 2 चौकार अन् 3 षटकारासह 44 धावा केल्या. तर कर्णधार मेग लॅनिंग हिने 23 चेंडूत 23 धावा केल्या.जेमिमा आणि एलिस कॅप्सी हिला खातेही उघडता आले नाही. यानंतर श्रेयंका पाटीलने दिल्लीच्या फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. दिल्लीची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, एकेकाळी बिनबाद 64 धावा करणारा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 113 धावांवर सर्वबाद झाला. मारिजाने कॅप आठ धावा केल्यानंतर, जेस जोनासेन तीन धावा करून आणि मिन्नू मणी पाच धावा करून बाद झाली. अरुंधतिने 10 आणि राधा यादव हिने 12 धावांची खेळी केली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-winner-prize-money-winner-and-runner-up-will-get-so-many-crores-know-the-prize-money/
आरसीबीतर्फे श्रेयंका पाटीलने चार, मोलिनक्सने तीन आणि आशाने दोन गडी बाद केले. विशेष म्हणजे आरसीबीच्या फिरकीपटूंनी नऊ विकेट घेतल्या तर राधा यादव धावबाद झाली.