WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Final 2024 : महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांच्या नजरा त्यांच्या पहिल्या विजेतेपदावर आहेत. त्यांच्या पुरुष संघांनाही कधीही विजेतेपद मिळालेले नाही. यामुळे महिला प्रीमियर लीगला नवा चॅम्पियन मिळणार आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपदावर कब्जा केला होता.
तत्पूर्वी, महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॅनिंगने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये श्रद्धा पोखरकरच्या जागी एस मेघनाला प्लेइंग-11 मध्ये एंट्री मिळाली आहे.
🚨 Toss Update 🚨
🆙 goes the coin and lands in favour of Delhi Capitals as they elect to bat against Royal Challengers Bangalore.
Follow the match ▶️ https://t.co/g011cfzcFp#TATAWPL | #DCvRCB | #Final | @DelhiCapitals | @RCBTweets pic.twitter.com/x2SIiHhc0z
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 17, 2024
DC vs RCB (Final) : दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे….
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), एस मेघना, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.
Here are your teams that will take the field in the all-important #Final 💪
Follow the match ▶️ https://t.co/g011cfzcFp#TATAWPL | #DCvRCB pic.twitter.com/aSizJ0X3eE
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 17, 2024
या मैदानावर दिल्लीने एकूण चार सामने खेळले आहेत. या तीन सामन्यांमध्ये घरच्या परिस्थितीचा फायदा संघाला झाला आहे. संघाला तीन सामने जिंकण्यात यश आले आहे, तर एका सामन्यात संघाला यूपीकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचवेळी या मैदानावर आरसीबीने चार सामन्यांत केवळ दोनदाच विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दिल्लीचे वर्चस्व दिसून येत आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, 8 पैकी 6 सामने जिंकले, 12 गुणांची कमाई केली आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध हरलेल्या सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-winner-prize-money-winner-and-runner-up-will-get-so-many-crores-know-the-prize-money/
आरसीबी आणि दिल्लीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. दोन्ही फ्रँचायझींच्या पुरुष संघांनाही आजपर्यंत अंतिम सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत जगाला एक नवा विजेता मिळणार आहे. आरसीबी पुरुष संघ तीन वेळा आयपीएलचा उपविजेता ठरला आहे.
2009 मध्ये अंतिम फेरीत डेक्कन चार्जर्सकडून संघाचा पराभव झाला होता. यानंतर 2011 मध्ये चेन्नईने आरसीबीचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला, तर पाच वर्षांनंतर 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या सेनेचा पराभव करून विजेतेपदाची संधी हिरावून घेतली. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सला फक्त एकदाच फायनल खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2020 मध्ये संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. या काळात मुंबईकडून संघाचा दारुण पराभव झाला.