नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm modi) यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली मेट्रोमध्ये एका मुलीने त्यांना खास संस्कृतमध्ये शुभेच्छा दिल्या. PM मोदींनी (PM Modi birthday) आज सकाळी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाइनच्या द्वारका सेक्टर 21 ते नवीन मेट्रो स्टेशन ‘यशोभूमी द्वारका सेक्टर 25’ पर्यंत विस्तारित करण्याचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर त्यांनी दिल्ली मेट्रोची (Delhi Metro) सवारी केली.या प्रवासादरम्यान महिला प्रवासी असलेल्या एका मुलीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा वाढदिवस तुम्हाला आनंद आणि भरभराटीचा जावो. तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते. देव तुमचे सदैव रक्षण करो. तुम्ही या मार्गावर चालत रहा, चांगले काम करा आणि तुमचे जीवन यशस्वी होवो असा आशय असलेले संस्कृतमधील गाणे म्हणत पंतप्रधान मोदींना या मुलीने मेट्रो प्रवासादरम्यान शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Girl birthday wishes pm modi in sanskrut)
व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी मेट्रोच्या आत प्रवाशांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी प्रवाशांनी पीएम मोदींसोबत सेल्फी घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही तुम्हाला सांगतो की, पंतप्रधान मोदींनी द्वारका येथे यशोभूमी म्हणून ओळखल्या जाणार्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (IICC) च्या पहिल्या टप्प्याचे अधिकृतपणे अनावरण केले. (Pm modi in delhi metro)
#WATCH | A traveller in Delhi Metro wishes Prime Minister Narendra Modi in the Sanskrit language on his 73rd birthday. pic.twitter.com/7inQ7Pt4Th
— ANI (@ANI) September 17, 2023
दिल्ली मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर
दिल्ली मेट्रोची अंदाजे 2 किमी लांबीची ‘यशोभूमी लाइन’ द्वारका सेक्टर 21 आणि इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला जोडेल. DMRC ने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘हा विभाग जोडल्यामुळे, नवी दिल्ली ते यशोभूमी द्वारका सेक्टर-25 पर्यंत विमानतळ एक्सप्रेस लाइनची एकूण लांबी 24.9 किमी होईल.’