IND vs AUS 1st ODI Score Update :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होत आहे.या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस पाचारणं केलं.
प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला 50 षटकात सर्व गडी गमावून 276 धावांंपर्यतच मजल मारता आली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर कमिन्स आणि झाम्पाने तीन धावा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना झम्पा धावबाद झाला. अशा प्रकारे भारतासमोर 277 धावांचे लक्ष्य ठेवण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावा केल्या. जोस इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावांचे योगदान दिले. लॅबुशेननेही 39 धावांंची खेळी केली.
भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. शमीनं 10 षटकात 51 धावा दिल्या. बुमराह, अश्विन आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली तर शार्दुल ठाकूरनं 10 षटकात सर्वाधिक 78 धावा दिल्या. त्यालाा एकही विकेट घेता आली नाही.