India Reaction On Iran Attack | इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या हल्ल्यावर भारतानेही चिंता व्यक्त केलीय. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून या हल्ल्याबद्दल तसेच भारतीय नागरिकांसाठी चिंता व्यक्त केली.
भारताने एक निवेदन जारी करून,”आम्ही इस्रायल आणि इराणमधील वाढत्या शत्रुत्वामुळे गंभीरपणे चिंतित आहोत, ज्यामुळे या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात आलीय. तसेच “मंत्रालय विकसित परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या प्रदेशातील आमचे दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. या प्रदेशात सुरक्षा आणि स्थिरता राखणे महत्त्वाचे आहे.”असे म्हटले गेले आहे.
इराणचा प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हल्ला India Reaction On Iran Attack |
सीरियातील दमास्कस येथील इराणच्या वाणिज्य दूतावासाच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्यानंतर तेहरानने बदला घेण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्युत्तर म्हणून त्यांनी तेल अवीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणने 100 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत.
इस्रायली लष्कराने सांगितले की, “डझनभर पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हद्दीकडे जात आहेत. त्यापैकी बहुतेकांना परिसर ओलांडण्यापूर्वी थांबविण्यात आले. “सैनिक सर्व आघाड्यांवर तैनात आहेत, तयार आहेत आणि त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करत आहेत.”
दमास्कसमधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर १ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला आहे. या हल्ल्यात दोन जनरल्ससह रिव्होल्युशनरी गार्डचे सात जवान ठार झाल्याची माहिती इराणच्या माध्यमांनी दिली आहे. इराणने या हल्ल्याचा बदला घेण्याचे वचन दिले होते. शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इराणला इस्रायलवर हल्ला करण्याबाबत इशारा दिला. भारताने शुक्रवारी एक ॲडव्हायझरी जारी करून आपल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.
इराणकडून अमेरिकेला इशारा India Reaction On Iran Attack |
त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रातील इराणी मिशनने अमेरिकेला या प्रकरणापासून दूर राहण्याचा इशारा देताना म्हटले आहे की, “इस्रायली राजवटीने आणखी एक चूक केली तर इराणची प्रतिक्रिया अत्यंत गंभीर असेल.” आता हे प्रकरण बंद करण्याचा विचार करावा, असे सांगण्यात आले.
हेही वाचा
इराणकडून इस्रायलवर हवाई हल्ला ; शेकडो ड्रोन अन् क्षेपणास्रे डागली