‘Mr and Mrs Mahi’ Release date| सध्या एकामागोमाग एक चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत. नुकताच ‘मैदान’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर आता ‘मिस्टर अँड मिसेस माही’ प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या या चित्रपटाची रिलीज डेटमध्ये सतत बदल केला जात होता. अखेर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आधी १९ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण, आता ३१ मे रोजी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने ‘मिस्टर अँड मिसेस माही’ सिनेमाची निर्मिती केली आहे.
View this post on Instagram
करणने पोस्ट शेअर करत या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. “काही चित्रपट हे स्टोरीपेक्षा अधिक असतात. प्रेक्षकांना ते त्यांच्या स्वप्नांविषयी सांगतात. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा सिनेमा आमच्या जवळचा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत आहोत. ३१ मे २०२४! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!!”, असं या पोस्टमध्ये करणने म्हटलं आहे.
दरम्यान, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ सिनेमा भारताचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट क्रिकेटर असलेल्या महेंद्रसिंग धोनीवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. शरण शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून यात राजकुमार महेंद्र तर जान्हवी महिमाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा:
पूजा हेगडेने मुंबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत वाचून व्हाल थक्क…