मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांनी मुख्यमंत्री @mieknathshinde यांना वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरुन शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 9, 2023
सुदृढ, निरोगी, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आजचा दिवस आपल्याला निश्चितच बळ देईल, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.