पिंपरी, दि. 9 – पुण्यातील कसबा, शहरातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकरिता दि. 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करुन घेण्यात आला आहे.
स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, गिरीष बापट, धनंजय महाडिक, मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री विनोद तावडे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार प्रवीण दरेकर, आशिष शेलार, श्रीकांत भारतीय, रविंद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, राहुल कुल, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, विजय देशमुख, आमदार माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा 40 जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.