मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया सिडनीमध्ये पोहोचली आहे. भारताला याठिकाणी दुसऱ्या सुपर-१२ सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहे. हा सामना २७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघ सिडनीत होणाऱ्या सामान्याच्या आयोजकांवर नाराज झाल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सरावानंतर भारतीय खेळाडूंना थंड जेवण देण्यात आले. त्याचवेळी सरावासाठी संघाला हॉटेलपासून ४२ किमी दूर जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे एवढा लांबचा प्रवास करण्यास खेळाडूंनी नकार दिला आहे.
शोएब अख्तर म्हणतोय, “विराट तू टी-२० क्रिकेटमधून सन्यास घे…”
एएनआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सिडनीमध्ये सरावानंतर देण्यात आलेल्या जेवणावर भरतोय संघातील खेळाडू खूश नव्हते. भारतीय खेळाडूंना त्यांच्या सराव सत्रानंतर गरम जेवण देण्यात आले नाही. जेवणाच्या मेनूमध्ये फक्त सँडविचचा समावेश होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “टीम इंडियाला दिलेले जेवण चांगले नव्हते. यामध्ये त्यांना फक्त सँडविच देण्यात आले. सिडनीतील सराव सत्रानंतर दिलेले जेवण थंड आणि चांगले नसल्याचेही भारतीय संघाकडून आयसीसीला सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC ) टी-२० विश्वचषकादरम्यान आहार पुरवण्याचे कार्य करत असते. आश्चर्याची बाब म्हणजे, आयसीसीने दुपारच्या आहारात गरम जेवण दिले नाही. द्विपक्षीय मालिकेदरम्यान, यजमान देशाकडून जेवणांची व्यवस्था केली जाते. बीसीसीआयच्या सूत्राने असेही सांगितले की, टीम इंडियाने यावेळी सराव सत्रात भाग घेतला नाही, कारण त्यांना हॉटेलपासून सुमारे ४५ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ब्लॅकटाउन (सिडनीला लागून असलेले एक छोटे शहर) सरावासाठी जागा देण्यात आली होती.
Australia | The food that was offered to Team India was not good. They were just given sandwiches and they have also told ICC that food provided after the practice session in Sydney was cold and not good: BCCI sources https://t.co/VieFL1NNxM pic.twitter.com/QT9Mlr0XBG
— ANI (@ANI) October 26, 2022
Australia | Team India did not do practice sessions as it was offered a practice venue in Blacktown (suburbs of Sydney). They refused because it is 42 kms away from the hotel where they are staying: BCCI sources
— ANI (@ANI) October 26, 2022
भारतीय संघासोबत घडलेल्या या आहाराचा प्रकारानंतर आयसीसीने त्यावर प्रतिक्रिया दिली. आयसीसीच्या एका सूत्राने याबाबत सांगितले की, “जेवणाचा मेनू सर्व संघांना आधीच सांगितला होता. त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी आधी सांगायला हवे होते. तरीही ही बाब गांभीर्याने घेत आहोत.” भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या प्रकरणावर बोलण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. सेहवागने ट्विटरवर म्हटले की, “ते दिवस गेले जेव्हा लोकांना वाटायचे की पाश्चिमात्य देशांमध्ये पाहुण्यांचे स्वागत केले जाते. आता भारत या बाबतीत बहुतेक पाश्चात्य देशांच्या पुढे आहे.”
Gone are the days when one used to think that the Western countries offer so good hospitality. India are way ahead of most western countries when it comes to providing hospitality of the highest standards.
— Virender Sehwag (@virendersehwag) October 26, 2022