भारत-चीनमध्ये आणखी रुग्ण आहेत : ट्रम्प

चाचण्या वाढवल्या तर रुग्णही वाढतील

वॉशिंग्टन – करोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी अमेरिकेत सर्वाधिक असल्याचे मानले जात असले तरी भारत आणि चीनमध्ये जर आणखी चाचण्या घेतल्या गेल्या, तर तेथील रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा अधिक ठरेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेमध्ये 2 कोटी चाचण्या घेतल्या गेल्या आहेत, असे ट्रम्प म्हणाले. मरिना येथील प्युरिटन मेडिकल प्रॉडक्‍टसमध्ये ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेशी तुलना करता जर्मनीमध्ये 40 लाख चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. तर सर्वाधिक चर्चा झालेल्या दक्षिण कोरियामध्ये 30 लाख चाचण्या घेतल्या गेल्या आहेत, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
जॉन हॉपकिन्स करोनाव्हायरस रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत 19 लाख रुग्ण आहेत. त्यापैकी 1 लाख 9 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतात 2 लाख 36 हजार आणि चीनमध्ये 84 हजार इतके करोनाचे रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत 40 लाख चाचण्या घेतल्या गेल्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिका लवकरच 2 कोटी चाचण्यांचा टप्पा पूर्ण करेल. जेव्हा चाचण्या जास्ती घेतल्या जातात, तेव्हाच जास्ती रुग्ण सापडतात, असेही ट्रम्प म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.