आक्षेपार्ह विधानावर युवराजचा माफीनामा

चंदीगड – भारतीय क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल याच्यावर जातीवाचक टीका केल्यामुळे वादात सापडलेल्या सिक्‍सरकिंग युवराजसिंगने माफी मागितली आहे. सोशल मीडियावर एका चॅट शोमध्ये हिटमॅन रोहित शर्माशी चर्चा करताना युवराजने चहलवर जातीवाचक टीका केली होती. त्यामुळे तो वादात अडकला होता. त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती.

माझ्या वक्‍तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. कोणत्याही समाजाला लक्ष्य करण्याचा व अपमानित करण्याचा माझा हेतू नव्हता. यापुढील काळात मी कोणतेही विधान करताना भान ठेवीन, अशा शब्दांत युवराजने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.