तैपैई – चीनसाठी हेरगिरीचे काम करत असल्याच्या आरोपावरून तैवानमध्ये एका पिता- पुत्राला आठ वर्षांची शिक्षा तेथील न्यायालयाने ठोठावली आहे. तैवानच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने याबाबतचही बातमी दिली आहे. तैवान उच्च न्यायालयाच्या तैनात खंडपीठाने हुआंगो आडनाव असलेल्या दोघांना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे. (Taiwan: Father, son duo sentenced to 8 years for spying for China)
चीनसाठी गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी या दोघांनी सक्रिय ड्यूटी सैन्य कर्मचाऱ्यांची भरती केली होती असा त्यांच्यावर आरोप होता. वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार खटल्याची सुनावणी सुरू असताना दोन्ही आरोपींनी आपल्यावरच्या आरोपांचा कबुली जबाब दिला आहे. आरोपींनी २०१५ मध्ये जियानमेन येथे एक व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी चीनच्या गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याशी त्यांची ओळख झाली होती.
चीनसाठी हेरगिरीचे जाळे उभारण्यात मदत करावी असा त्यांना आग्रह केला गेला होता. लष्कराची माहिती जाणून घेण्यासाठी तैवानच्या सैनिकांना या नेटवर्कमध्ये सहभागी करून घेण्याचा डाव होता. या कामासाठी हुआंगो पिता पुत्राला आर्थिक गाजर दाखवण्यात आले होते.