South Africa Vs India 3rd ODI Live score :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (21 डिसेंबर) खेळवला जात आहे. पार्ल येथील बोलंड पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी या मालिकेत प्रत्येकी 1 सामना जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता हा तिसरा सामना जिंकताना मालिकाही जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज बनले आहेत.
भारत विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टाॅस हारल्यानंतर टीम इंडियाला प्रथम फलंदाजीला यावे लागले. भारताने 50 षटकांत आठ विकेट गमावत 296 धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Innings Break!
Sanju Samson’s knock of 108 runs powers #TeamIndia to a total of 296/8.
Scorecard – https://t.co/u5YB5B03eL #SAvIND pic.twitter.com/YG5Xt7HVlF
— BCCI (@BCCI) December 21, 2023
भारताकडून संजू सॅमसनने 114 चेंडूत 108 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचे हे पहिले शतक आहे. याशिवाय टिळक वर्माने 77 चेंडूत 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावले. 101 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर सॅमसन आणि टिळक यांनी 116 धावांची भागीदारी केली. शेवटी रिंकू सिंगने 27 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या.
याशिवाय पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या रजत पाटीदारने 16 चेंडूत 22 धावा केल्या तर कर्णधार केएल राहुलने 35 चेंडूत 21 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 14 धावा करून बाद झाला तर साई सुदर्शन 10 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलला एकच धाव करता आली. अर्शदीप सिंग सात धावा करून तर आवेश खान एक धावेवर नाबाद राहिला.
IND vs SA 3rd ODI : संजू सॅमसनने 8 वर्षांच्या पदार्पणानंतर झळकावले पहिले शतक….
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत ब्युरेन हेंड्रिक्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. नांद्रे बर्जरला दोन यश मिळाले. लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.