मुंबई – मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन प्रकल्पालाही काम बंद नोटीस जारी करण्यात आली आहे. बीकेसीमधील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे पालन होत नसल्याने काम बंद नोटीस देण्यात आली आहे.
तसेच बुलेट प्रकल्पाच्या बाजूलाच असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या रेडिमिक्समधून होणारे प्रदूषण पाहता या प्लांटलाही ‘काम बंद’ची नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जात नसल्याने या ठिकाणी काम बंद नोटीस देण्यात आली.
प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे नोटीस बजावण्यात आली. मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत.
मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन योग्य रीतीने होत नसल्याने मुंबईतील मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन काम करणाऱ्या कंत्राटदाराला बीएमसीकडून काही दिवस काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.