IND vs SA 2nd Test Live Cricket Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे तर टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने दमदार गोलंदाजी करत यजमान संघाचा पहिला डाव उपाहारापूर्वी 23.2 षटकांत 55 धावांत गुंडाळला.
आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांत आटोपल्यानंतर भारतानं पहिल्या डावात फलंदाजीस सुरूवात केली असून चहापानापर्यंत भारताने चार गडी गमावून 111 धावा केल्या आहेत. विराट कोहली 20 धावा करून खेळत आहे. त्याला दुसऱ्या टोकाला लोकेश राहुल साथ देत आहे. भारताकडे 56 धावांची आघाडी असून ही जोडी तिसऱ्या सत्रात भारताची आघाडी 150 धावांच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.
Tea on the opening Day of the 2nd #SAvIND Test!#TeamIndia 111/4, with a first-innings lead of 56 runs 👌👌
Final session of the day coming up shortly.
Scorecard ▶️ https://t.co/PVJRWPfGBE pic.twitter.com/4taA70RFuC
— BCCI (@BCCI) January 3, 2024
त्याआधी, भारताला पहिला धक्का 17 धावांवर बसला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही यशस्वी जैस्वालची बॅट चालली नाही. यशस्वी जैस्वाल खाते न उघडताच बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी रोहित अर्धशतकी भागीदारी केली. भारताची दुसरी विकेट 72 धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला. नांद्रे बर्जरने त्याला मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले.
त्यानंतर गिल आणि कोहली यांनी वेगाने धावा काढण्यास सुरूवात केली असता भारताची तिसरी विकेट 105 धावांवर पडली. शुभमन गिल 36 धावा करून बाद झाला. नांद्रे बर्जरने त्याला मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले. त्यानंतर लगेगच म्हणजे 110 धावसंख्येवर भारताला चौथा धक्का बसला. श्रेयस अय्यर खाते न उघडताच बाद झाला. त्याने फक्त दोन चेंडूंचा सामना केला. नांद्रे बर्जरने त्याला यष्टिरक्षक वॅरेनेकरवी झेलबाद केले.
IND vs SA 2nd Test Day 1 : सिराजचा विकेटचा षटकार, पहिल्या डावात द. आफ्रिका अवघ्या 55 धावांत गारद…
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर फलंदाजीत त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसून आली आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडेन मार्करम (2 धावा), डीन एल्गर (4 धावा), टोनी डी जॉर्जी (2 धावा), ट्रिस्टन स्टब्स (3 धावा), मार्को यानसेन (0 धावा), केशव महाराज (3 धावा), कगिसो रबाडा (5 धावा), नांद्रे बर्गर (4 धावा) हे स्वस्तात बाद झाले.
IND vs SA 2nd Test Day 1 : दक्षिण आफ्रिकेच्या नावावर सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद…
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 6 विकेट्स घेऊन पहिल्या कसोटीत किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसणार्या आफ्रिकन फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.