IND vs NZ विश्वचषक 2023: टीम इंडियाची ODI विश्वचषक 2023 मधील कामगिरी आतापर्यंत खूपच खास आहे. रोहत शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने टीम इंडियाची (Team India) सातत्याने चांगली आणि वेगवान सुरुवात केली आहे. केवळ या स्पर्धेतच नाही तर वर्षभरात रोहत शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी मिळून खूप धावा केल्या आहेत. यासह रोहित-गिल (Rohit gill) या जोडीने वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा चमत्कार घडवून आणला आहे की, याआधी दुसरी कोणतीही जोडी करू शकली नाही.
रोहित-गिल जोडीचा विश्वविक्रम
रोहत शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी या स्पर्धेत चांगलीच आक्रमक दिसत आहे. विश्वचषक २०२३ च्या पहिल्या उपांत्य फेरीत या दोन्ही खेळाडूंनी न्यूझीलंडविरुद्ध चांगली सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ७१ धावा जोडल्या. रोहित आणि गिल यांच्यातील यंदाची ही १४वी ५०+ धावांची भागीदारी होती. यासह, ही एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली जोडी बनली आहे ज्यांनी एका वर्षात १४ वेळा ५०+ धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी कोणत्याही जोडीने ही कामगिरी केली नव्हती. (WorldCup 2023)
या दिग्गज जोडीला मागे टाकले
रोहत शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडनसारख्या दमदार जोडीला मागे टाकले आहे. अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन या जोडीने २००७ मध्ये १३ वेळा ५०+ धावांची भागीदारी केली होती. २००३ मध्येही या जोडीने १२ वेळा ५०+ धावांची भागीदारी केली होती. त्याच वेळी, १९९९ मध्ये मार्क वॉ आणि अॅडम गिलख्रिस्ट या जोडीने १२ वेळा ५०+ धावांची भागीदारी केली होती.
रोहत शर्माने स्फोटक खेळी खेळली
या सामन्यात रोहत शर्माने २९ चेंडूंचा सामना करत ४७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि तेवढेच षटकार मारले. तर, शुबमन गिल दुखावल्यामुळे रिटायर हर्ट झाला. शुभमन गिलने रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी ६५ चेंडूत ७९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले.