India Vs New Zealand World Cup 1st Semi Final 2023 Live Cricket Score: विश्वचषक स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया उतरेल.
IND vs NZ Live Score: शुभमन गिल retired hurt
शुभमन गिल 65 चेंडूत 79 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मात्र, तो नाबाद आहे. मुंबईच्या उष्णतेमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला आणि त्याला परत जावे लागले. आता विकेट पडल्यावर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. सध्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहली क्रीजवर आहेत. 24 षटकांनंतर भारताची धावसंख्या 1 बाद 173 इतकी झाली आहे.
शुभमन गिलचे अर्धशतक..
त्याआधी शुभमन गिलने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 13 वे अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.
तत्पूर्वी,भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाा. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोङीनं आक्रमक सुरूवात केली. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 70 इतकी झाली होती.
त्यानंतर 8.2 षटकात भारताची पहिली विकेट 71 धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. टीम साऊदीच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करत असताना तो केन विल्यमसनच्या हाती झेलबाद झाला. हा झेल खूप अवघड होता, पण विल्यमसनने अप्रतिम झेल घेतला.
रोहितच्या नावे आणखी एक विक्रम…
दरम्यान, रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावांची तुफानी खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. रोहित शर्माने या सामन्यात तीन षटकार ठोकले असून विश्वचषकात 51 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाराही तो खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मानं ख्रिस गेलचा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 28 षटकारांसह सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. या बाबतीतही त्याने 2015 च्या विश्वचषकात 26 षटकार मारणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले.
दरम्यान, याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने आले होते तेव्हा भारताने विजय मिळवला होता. तथापि, न्यूझीलंड हा एकमेव संघ होता ज्याने साखळी टप्प्यात भारताला चांगलीच टक्कर दिली होती. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीचा सामनाही रोमांचक होण्याची शक्यता आहे.