India vs Australia 2nd T20 Match Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (28 नोव्हेंबर) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. हा मालिकेतील फक्त तिसरा सामना असेल पण तो निर्णायक असेल कारण आजचा सामनाच ठरवू शकतो की ट्रॉफी कोणाला मिळेल.
वास्तविक, टीम इंडियाने या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाने आजच्या सामन्यातही विजय मिळवला तर ते मालिकेवर कब्जा करतील. अजेय आघाडी घेण्याच्या उद्देशानेच भारतीय संघ येथे मैदानात उतरेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी ही ‘करा किंवा मरो’ चा हा सामना असेल.
ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यात भारतीय संघाला चांगली लढत दिली पण त्यांना विजय मिळवता आला नाही. आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय-पराजयाचे हे छोटेसे अंतर भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
गुवाहाटीमध्ये आजचा सामना…
गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मैदानावर आतापर्यंत केवळ दोनच सामने झाले आहेत. एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 120 धावाही करता आल्या नाहीत तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 225 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. अशा स्थितीत खेळपट्टीबाबत आकलन करणे अवघड आहे. नाणेफेकीच्या वेळीच हे काही प्रमाणात उघड होऊ शकते.
यापूर्वीही या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ टी-20 क्रिकेटमध्ये भिडले आहेत. 2017 मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर आणि कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ/शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, तन्वीर संघा.
भारत : यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसीद कृष्णा.