मुंबई – मंगळवारी रुपयाचे मूल्य ते 33 पैशांनी वाढून रुपयांचा भाव 83.28 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला होता. शुक्रवारी रुपयाच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आज काही प्रमाणात परकीय चलन बाजारात हस्तक्षेप केला असल्याचे समजले जाते. (Increase in the value of the rupee! 83.28 per dollar level)
जगातील इतर मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचा भाव काही प्रमाणात कमी झाला. त्याचबरोबर खनिज तेलाच्या किमतीही काही प्रमाणात कमी झाल्यामुळे रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत झाली असल्याचे काही व्यापार्यांनी या संदर्भात बोलताना सांगितले. मात्र एकूण जागतिक परिस्थिती पाहता रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीकडे रिझर्व्ह बँकेला लक्ष ठेवावे लागणार असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.