GST Demand Notice – लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एलआयसीला जीएसटी अधिकार्यांनी 39 लाख 39 हजार रुपयांचा जीएसटी भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. ही नोटीस 2017-18 या आर्थिक वर्षासाठीची असल्याचेही जीएसटीच्या अधिकार्यांनी नमूद केले आहे.
जानेवारी 2024 मध्ये ही नोटीस एलआयसीला मिळाली असल्याचे एलआयसीने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे. एलआयसीने यासंदर्भात संबंधित न्यायधीकरणाकडे अपील केले असल्याचेही एलआयसीने स्पष्ट केले आहे.