Indian Premier League 2024 Live Cricket Score, CSK vs GT : आज IPL 2024 च्या सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला जात आहे. दोन्ही संघ आपापले मागील सामने जिंकून मैदानात उतरले आहेत. अशा स्थितीत विजयाची घोडदौड कायम ठेवण्याकडे चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांच्या नजरा असतील. गेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव केला होता तर गुजरातने गेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवम दुबेचे झंझावती अर्धशतक व कर्णधार ऋतूराज गायकवाड, रचीन रवींद्र आणि डॅरेल मिशेल यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्य जोरावर चेन्न्ई सुपर किंग्जने 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे.
And now it’s time to defend! 💪🏻🥳#CSKvGT #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/N4gOmhURBl
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 26, 2024
चेन्नई सुपर किंग्जसाठी प्रथम, रचिन रवींद्रने 20 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावा करून चांगली सुरूवात केली . शेवटी समीर रिझवीने रशीद खानने दोन षटकार मारून संघाची धावसंख्या दोनशेजवळ नेली. यूपीच्या समीर रिझवीने सहा चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने 14 धावा केल्या.
या दोघांशिवाय शिवम दुबेने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. दुबेने 23 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर कर्णधार गायकवाडने 36 चेंडूत 5 चौकार अन् 1 षटकारासह 46 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे पुन्हा फ्लॉप ठरला, पण त्याने कर्णधार रुतुराजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. रहाणे 12 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.
डॅरिल मिशेलने 20 चेंडूत 2 षटकारासह 24 धावांची नाबाद खेळी खेळली. जडेजा 3 चेंडूत 7 धावा काढून नाबाद राहिला. गुजरातकडून गोलंदाजीत राशिदने दोन बळी घेतले. तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.