नवी दिल्ली – जपानच्या रिझर्व्ह बॅंकेने अचानक तेथील कर्ज रोख्यावरील परतावा वाढावा असे धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर या घडामोडीचा जागतिक चलन बाजारावर परिणाम झाला. इतर चलनाच्या तुलनेत अमेरिकेचा डॉलर कमकुवत आहे होत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीकडील गुंतवणूक वाढून सोने आणि चांदीच्या दारात वाढ झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
Stock Market : चीनमध्ये करोनाचा उद्रेक; भारतीय शेअर बाजारावर झाला परिणाम
दिल्ली सराफात सोन्याचा दर 192 रुपयांनी वाढून 55,261 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 433 रुपयांनी वाढून 69,962 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,815 डॉलर व चांदीचा दर 23.94 पातळीवर गेला होता. या संदर्भात बोलताना मोतीलाल ओसवाल या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, जपानमधील डॉलर कमकुवत होत आहे.
या कारणामुळे बरीच गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. करोनाचा उद्रेक आणखी वाढला तर सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. चीनमध्ये जर करोना वाढला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक पिछाडीवर आहेत. अशा परिस्थितीत सोने आणि चांदी वधारू शकते असे काही विश्लेषकांना वाटते.