पिंपरी -गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान सातत्याने वाढत आहे. मंगळवारी शहराचे तापमान 37 अंश सेल्सियसच्याही पुढे गेले होते. त्यामुळे दिवसभर वातावरणात उकाडा होता. आकाश निरभ्र होते.
पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, दिवसभरात पुणे येथे 37.5 अंश सेल्सिअस इतके कमाल तर, 14.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. तर, सकाळी 8:30 वाजता नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, चिंचवड येथे 39 अंश सेल्सिअस इतके कमाल तर, 21.3 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. वेधशाळेच्या अंदाजानुसार, 19 ते 21 तारखेदरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.