पंजाबमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाध्यक्षा साेनिया गांधी ॲक्शन माेडमध्ये आल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गाेवा आणि मणिपूर या निवडणूक झालेल्या पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
As desired by the Congress President I have sent my resignation … pic.twitter.com/Xq2Ne1SyjJ
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 16, 2022
नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून पंजाब प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. सिद्धूने यांनी लिहिले की, “काँग्रेस पक्षाच्या हायकमांडच्या इच्छेनुसार मी हे केले आहे.”
पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 18 जागा जिंकता आल्या. अमृतसर पूर्व मतदारसंघातून नवज्योत सिंग सिद्धू यांचा आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.