पुणे – मागणी वाढल्यामुळे मार्केटयार्डात रविवारी खरबूज, पपई, स्ट्रॉबेरी आणि बोरांच्या भावात वाढ झाली. कलिंगडाच्या भावात मात्र घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी मार्केटयार्डात फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, मोसंबी 25 ते 30 टन, संत्री 35 ते 40 टन, डाळींब 20 ते 25 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, पेरू 350 ते 400 क्रेट, चिकू 2 हजार गोणी, खरबुजाची 10 ते 15 टेम्पो, बोरे 200 ते 250 गोणी, स्ट्रॉबेरी 10 ते 15 टन, द्राक्षे 20 ते 25 टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव
लिंबे (प्रति गोणी) : 300-700, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : जुना (3 डझन) : 300-650, (4 डझन) : 200, मोसंबी नवीन (3 डझन) : 200-350, (4 डझन) : 80-180, संत्रा : (10 किलो) : 200-600, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 60-250, गणेश : 30-80, आरक्ता 40-120. खरबूज : 15-22, पपई : 5-12, चिकू (10 किलो) 100-600, पेरू (20 किलो) : 400-500, बोरे (10 किलो) चमेली : 220-280, उमराण : 60-100, चेकनट : 800-1000, चण्यामण्या 350-400, स्ट्रॉबेरी (दोन किलो) 80-200.