पुणे – दिल्लीत शेतकऱ्यांनी तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात जे आंदोलन सुरू केले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेस सेवादलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुणे शहर कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून या उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, ऍडव्होकेट संतोष म्हस्के अदिंची यावेळी भाषणे झाली. महात्मा गांधी पुण्यातिथिनिमीत्ताने त्यांनाहीं यावेळी आदरांजली वाहण्यात आली. शेतकऱ्यांनी त्यांच्या रास्त मागण्यासाठी सनदशीर मार्गाने जे आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या पाठीशी संघटीत शक्ती उभी करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपोषणात स्नेहलता पवार, रंजनाताई रजपुत, आशा विधाते, शंकर वाणी इत्यादी सहभागी झाले होते.