नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 449 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 79 हजार 335 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 94.63 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यात करोनाच्या रुग्णवाढीत जिल्हा आजही सहाशाच्या पुढे आहे. त्यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 314 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 152, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 403 आणि अँटिजेन चाचणीत 88 रुग्ण बाधित आढळले असून एकूण 643 ने वाढ झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 53, अकोले 3, जामखेड 9, कोपरगाव 31, नगर ग्रामीण 6, नेवासे 1, पारनेर 2, पाथर्डी 2, राहाता 2, राहुरी 14, संगमनेर 4, शेवगाव 21, श्रीगोंदा 3, इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 123, अकोले 8, जामखेड 3, कर्जत 3, कोपरगाव 17, नगर ग्रामीण 25, नेवासे 13, पारनेर 6, पाथर्डी 1, राहाता 60, राहुरी 20, संगमनेर 37, शेवगाव 10, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 44, कॅन्टोन्मेंट 2, इतर जिल्हा 27, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 88 जण बाधित आढळून आले. मनपा 19, जामखेड 5, कर्जत 3,
नगर ग्रामीण 10, नेवासे 12, पाथर्डी 20, राहाता 2, राहुरी 4, संगमनेर 2, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 3 आणि इतर जिल्हा 3, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 156, अकोले 5, जामखेड 6, कोपरगाव 45, नगर ग्रामीण 16, नेवासे 11, पारनेर 23, पाथर्डी 16, राहाता 47, राहुरी 15, संगमनेर 53, शेवगाव 17, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 1 आणि इतर जिल्हा 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.