सातारा – पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शनिवारी रात्री उशिरा पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांची पदोन्नती झाली असली तरी त्यांना सोडण्यात आले नसल्याने त्यांची नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे.
तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मच्छले यांची पुसेगाव पोलीस ठाणे, शाहूपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांची लोणंदला,कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांची रहिमतपूर येथे बदली करण्यात आली आहे. या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.