पारनेर, (प्रतिनिधी) – दुभाजकावर पिकअप धडकून पलटी झाल्याने तिघे गंभीर जखमी झाले असन, सुपा पोलिसांनी मुद्देमालासह तिघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अनिकेत प्रकाश कांडेकर यांनी फिर्याद दिली. दि.२४ मार्च रोजी सकाळी ११ च्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी ( एमएच-१३ एएन १०२९) नगर-पुणे महामार्गाने नगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना नारायणगव्हाण शिवारातील राज्यस्थानी धाब्याजवळ चालकाच्या चुकीमुळे पिकअप गाडी रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली
त्यामध्ये चालकासह तिघे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत करत सुपा पोलिसांना पाचारण केले. सुपा पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा त्यांनी पाहिले तर त्यात दहा गोण्यांमध्ये भरलेले गोमांस आढळले. सुपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत गाडीसह मुद्देमाल ताब्यात घेतला. गाडीतील तिघांनाही ताब्यात घेतले.
सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्यासह सहायक फौजदार एस एन कुटे व पोलीस हवालदार एस.बी.चौधरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पिकअपमधील आरोपी नईम कदीर कुरेशी, अल्ताफ यासीन कुरेशी (बंगाल चौकी) अफजान आब्दुल कुरेशी (रा.सुभेदार गल्ली झेंडीगेट,नगर ) या तिघांना ताब्यात घेत गाडीमधील सुमारे ३७.५०० किंमतीचे गोवंश मांस, पिकअप गाडी असे एकून १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सुपा पोलिसांनी तिन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.