सासवड,(प्रतिनिधी) – येथे तुकाराम महाराज बीज निमित्त श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था यांच्या वतीने अडीच लाख रुपये खर्च करून वैकुंठ रथ लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. 27) आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पार पडला.
सकाळी नगरपालिके समोरुन रथाची मिरवणूक काढण्यात आली. नगरपालिका ते कन्हैया चौक, नेताजी चौक, भैरमपूरा चौक, मार्गे मारुती मंदिर येथून संत सोपानदेव मंदिर येथे मिरवणूक आली. या ठिकाणी लोकार्पण सोहळा आमदार संजय जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी हनुमान भजनी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल जगताप, सचिव ज्ञानदेव कामठे, कार्याध्यक्ष सुधाकर गिरमे, उपाध्यक्ष तुकाराम गिरमे, सहसचिव राजेंद्र शिंदे, खजिनदार राजेंद्र भैरवकर, संचालक बबन टिळेकर,
नामदेव बोरावके, चंद्रकांत जगताप, हिराबाई कुंभार, शोभा सस्ते, चंद्रकांत जगताप यांनी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले.
यावेळी भगवान होले, दिवाणजी कामठे, उत्तम एक्के, अशोक भोंगळे, विलास गळंगे, मुरलीधर जगताप, नामदेव बोडके, मधुकर हेंद्रे, हनुमंत जाधव, मीना भैरवकर, माया दिवसे, कमल म्हेत्रे, उषा नांदे, सुदाम सावंत, रामभाऊ जगताप, संजय काटकर, संजय चव्हाण, सारंग महाराज आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप टीळेकर यांनी केले.
रथ नगरपालिका येथे उभा ठेवण्यात येणार आहे तेथून तो लोकांना अल्प दरात उपलब्ध राहील. आयुष्य वाढवणारे शहर म्हणून सासवड शहराचा उल्लेख केला जातो आज तुकाराम महाराज रथ वितरण संपन्न होत आहे. – संजय जगताप, आमदार