वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्ह्यातील महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये जागतिक जल दिननिमित्त विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वर्ड वॉटर डे (जागतिक जलदिनाची) मानवी प्रतिकृती तयार करुन जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली.
जागतिक जलदिन म्हणून 22 मार्च हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी वर्ड वॉटर डे (जागतिक जल दिन) मानवी प्रतिकृती तयार करून पाण्याचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी प्राचार्य सतीश निगडे, पर्यवेक्षक राजेश सोनवणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे, सुनील ढवळे, सतीश अधिकारी, अनिल मखरे, मंदाकिनी माने आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी विशांत ठाकूर, अतुल गायकवाड, संदीप जाधव, अनिल दुर्गाडे, दत्तात्रय टिळेकर, अंकिता ठाकूर, गीतांजली मोरे, शैला गवारी, प्रियांका कणेरे, लक्ष्मण भालसिंग आदिंनी परिश्रम घेतले.