पिंपरी – महापालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य मोहीमेची सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी 362 विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने या मोहीमेचा प्रारंभ आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या आकुर्डी रुग्णालय येथे करण्यात आला.
या वेळी सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, महिला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदीसह महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सोमवार (दि. 7) पासून विशेष इंद्रधनुष्य मोहिम सुरू करण्यात आली आहे. या दिवशी दिवसभरात 60 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 790 बालकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये 0 ते 1 वयोगटातील 460, 1 ते 2 वर्षे वयोगटातील 189, 2 ते 5 वर्षे वयोगटातील 84 तर गर्भवती मातांचे 57 असे एकूण 790 जणांचे लसीकरण करण्यात आले.
आकुर्डी ः बालकांचे लसीकरण करून महापालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे उद्धाटन करण्यात आले. या वेळी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, महिला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार आदी.