प्रियांका चोप्रा 2003 मध्ये एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये आली. तेव्हापासून तिने हिंदीबरोबर इंग्रजी फिल्म्समध्येही काम केले आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आतापर्यंत प्रियांका हॉलीवूडमधील ऑफ बीट सिनेमांमध्येच काम करत राहिली होती.
2012 मध्ये तिने प्रथमच हॉलीवूडमधील “इन माय सिटी’ या प्रोजेक्टमध्ये काम केले होते. त्यानंतर 2014 मध्ये “क्वांटिको’ ही अमेरिकेतील टीव्ही सिरीजही तिला मिळाली. या टीव्ही सिरीजचे तीन सीझन होऊन गेले आहेत.
त्यानंतर तिने “बेवॉच’मध्येही काम केले. आता “मॅट्रिक्स रिसरेक्शन’मध्ये ती झळकणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद वाटला असणार. मात्र, प्रियांका “मॅट्रिक्स…’मध्ये केवळ 8 ते 10 मिनिटांसाठी दिसणार आहे. त्यामुळे या चाहत्यांची निराशा होणार आहे. सिनेमाच्या उत्तरार्धात अगदी ओझरती ती दिसणार आहे.
केवळ 2 सीन मध्येच तिला काम करता येणार आहे. “मॅट्रिक्स रिसरेक्शन’चा हिरो केनू रिव्हजबरोबर ती अगदी थोडावेळ दिसणार आहे. 2003 मध्ये रिलीज झालेल्या “द मॅट्रिक्स रिव्होल्युशन्स’मध्ये एक बालकलाकार दिसली होती. ती “रिसरेक्शन’मध्ये मोठी झाली असणार आहे. त्या मुलीचा म्हणजे सतीचा रोल प्रियांका करते आहे.