सनी देओल आणि अमिषा पटेलच्या मुख्य भूमिका असलेला “गदर 2′ चे शूटिंग सुरू झाले आहे. मात्र, हा सिनेमा आता अडचणीत सापडला आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या सिनेमाचे शूटिंग ज्या घरामध्ये सुरू आहे.
त्या घरमालकाने एका दिवसासाठी 11 हजार रुपयांऐवजी 58 हजार रुपयांचे बिल निर्मात्यांच्या हातात दिले. त्यांनी घराच्या ज्या भागात शूटिंग करायचे ठरवले होते, त्यापेक्षा अधिक जागेचा वापर शूटिंग दरम्यान केला, असा या घरमालकाचा आरोप आहे. एवढेच नाही तर निर्मात्यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोपही घरमालकाने केला आहे.
“गदर-2′ चे शूटिंग हिमाचल प्रदेशमधील भलेड गावात सुरू आहे. या गावातच मुख्य कलाकारांसह सर्व तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी मुक्काम केला आहे. काही शूटिंगसाठी एक घर 11 हजार रुपये भाड्याने घेतले गेले.
3 खोल्या आणि 1 हॉल एवढेच शूटिंगसाठी वापरले होते. मात्र, शूटिंगसाठी सर्व घर वापरले गेले. त्यामुळे नाराज झालेल्या घरमालकाने भाड्याची रक्कम 58 हजार रुपये केली.