देशात करोनाचा नवीन प्रकार ‘ओमायक्रॉन’च्या वाढत्या वेगामुळे सरकारची चिंता वाढली आहे. या संदर्भात गुरुवारी पंतप्रधान मोदींनी देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. असे असताना आज तामिळनाडून एकाच दिवसात 33 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
Total cases of #Omicron variant in Tamil Nadu rises to
34: State Health Minister Ma Subramanian(File photo) pic.twitter.com/015HnA0bvq
— ANI (@ANI) December 23, 2021
तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 34 वर पोहोचली आहे. एकाच दिवसात 33 रुग्ण मिळाल्याने ही संख्या अचानक वाढली आहे. तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम.ए सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारपर्यंत तामिळनाडूमध्ये एकच केस होती पण अचानक एका दिवसात केसेस वाढल्या आहेत. देशातील ओमायक्रॉनच्या एकूण संक्रमितांची संख्या 280 झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक (65), दिल्लीत (57), तेलंगणामध्ये (24), राजस्थानमध्ये (22), कर्नाटक तसेच हरियाणामध्ये (19) रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी, बुधवारी गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे (9)रुग्ण आढळले आहेत. केरळ (24), उत्तर प्रदेशात (2) प्रकरणे आहेत. आंध्र प्रदेशात (2), पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक प्रकरण आहे.