बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असतो. वास्तविक, त्याची ड्रेसिंग एक्सपेरिमेंट चाहत्यांसाठी प्रत्येक वेळी धक्कादायक असते. यावेळीही रणवीरने सेल्फी पोस्ट करत लॉकडाऊनमध्ये आपला बदललेला लूक चाहत्यांना शेअर केला आहे. यात रणवीरला पाहून त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देता येईल. रणवीर सिंहने इंस्टाग्राम स्टोरीवर आपली शर्टलेस सेल्फी पोस्ट केली आहे. यात रणवीर लांब केस आणि शेव्ह लूकमध्ये दिसत आहे.
अभिनेत्याचा हा लूक त्याच्या जुन्या दिवसांची आठवण करून देणारा आहे. त्यातच रणवीरने एका जाहिरातीमधील त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यातही तो लांब केस आणि क्लीन शेव्ड लूकमध्ये दिसला होता. तसेच लॉकडाऊनमध्ये रणवीरने इतर लूक देखील ट्राय केले आहेत. आपल्या मागील पोस्टमध्ये त्याने हेअरकट आणि दाढी ठेवण्याचा लूकही चाहत्यांशी शेअर केला होता.
दरम्यान, रणवीर आणि दीपिका दोघेही सध्या घरी आहेत. हे सेलेब्रेटी त्यांचा वेळ खूप एन्जॉय करत आहेत. आपल्या जुन्या छायाचित्रांशिवाय ते सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओही शेअर करत असतात. तसेच दीपिकाचे कुकिंग स्किल पाहून रणवीर आश्चर्यचकित आहे. त्याने दीपिकाच्या जेवणाची जाहीरपणे प्रशंसा केली आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास त्यांचा आगामी “83′ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. रणवीरचा “गल्ली बॉय’ हा अखेरचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.