पुणे – जिल्ह्यात संथगतीने वाटचाल करणाऱ्या करोनाने पाश आवळण्यास सुरूवात केली आहे. आंबेगाव तालुक्यात 15 जण आढळले. तालुक्यात रुग्णसंख्या 30 वर पोहोचली आहे.
ग्रीन झोन असलेल्या जुन्नर तालुक्यात करोनाचा पहिला बळी गेला आहे. तालुक्यात बाधितांची संख्या 19 वर पोहोचली आहे.
शिरूर तालुक्यात करोनाने वृद्धेचा मृत्यू झाला आहे. दौंडमध्ये बाधित आढळला आहे. शिक्रापूर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांना करोनाची लागण झाली आहे. खेडमध्ये बाधितांची संख्या 23 वर पोहोचली आहे.