पुणे – महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन सभेद्वारे होणार आहे. पुढील महिन्यात 6 एप्रिलला सकाळी 11 वाजता ही निवडणूक होणार आहे.
भाजपच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त असून महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून मित्रपक्ष रिपाइंला हे पद देण्याचा निर्णय घेतला आहे.
अप्पर जमाबंदी आयुक्त आनंद रायते या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर या निवडणूकीसाठी पुढील आठवडयात बुधवारी (दि. 1 मार्च) दुपारी 3 ते 5 या वेळे अर्ज दाखल केले जाणार आहेत.
अशी होईल निवडणूक :
महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह उमेदवार आणि गटनेते महात्मा ज्योतीबा फुले सभागृहात उपस्थित असतील तर इतर नगरसेवक महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय निहाय प्रभाग समितीमध्ये उपस्थित राहून मतदान करतील.