वाल्हे -पुरंदर तालुक्यात गुरुवारी (दि. 25) तब्बल 83 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने किमान आता तरी जागे व्हा असे म्हणण्याची वेळ आली आहे. सासवड, जेजुरी या शहरांमध्ये एकूण 57 तर ग्रामीण भागातील 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही दोन्ही शहरे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.
सासवड येथील शासकीय लॅबमधील तपसण्यातील 102 संशयितांपैकी 50 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सासवड (24), भिवडी (3), माळशिरस (2), हरगुडे, सोनोरी, हिवरे, कुंभारवळण, बोपगाव, कोथळे, दौंडज, भिवडी, कोडीत, भिवरी, गराडे (प्रत्येकी 1). जेजुरीमध्ये 53 सशयितांपैकी 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये जेजुरी (23), कोळविहिरे, कोथळे (प्रत्येकी 3), सिंगापूर, धालेवाडी, नाझरे, तसेच तालुक्या बाहेरील लोणीकंद मधील (प्रत्येकी 1), असे एकूण 33 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.