मार्चमध्ये बजाज ऑटो, टोयोटाच्या विक्रीत वाढ

नवी दिल्ली -बजाज ऑटो कंपनीच्या मार्च महिन्यातील विक्रीत 18 टक्‍के वाढ झाली आहे. मार्च महिन्यात कंपनीने 3,93,351 इतकी वाहने विकली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कंपनीने 3,34,348 इतकी वाहने विकली होती.

मार्च महिन्यात मोटार सायकल विक्रीत 20 टक्‍के वाढ होऊन ती 3,23 538 युनिट्‌स इतकी झाली आहे. मार्च महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री आठ टक्‍क्‍यांनी वाढून 69,813 इतकी झाली आहे. मार्च महिन्यात निर्यात तीन टक्‍क्‍यांनी वाढून 01,34,166 युनिट्‌स इतकी झाली आहे. 2018-19 वर्षात कंपनीची एकूण विक्री 50,19,503 युनिट्‌स इतकी झाली आहे.

गेल्या वर्षाच्या 40,06,791 युनिटच्या तुलनेत ही विक्री 25 टक्‍के जास्त आहे. दरम्यान टोयोटा किर्लोस्कर मोटरने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये आर्थिक वर्ष 2017-18 च्या तुलनेत विक्रीत 7 टक्‍के वाढ दर्शविली आहे. मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय बाजारपेठेत (निर्यात वगळता) कंपनीने 1,50,525 युनिटसची विक्री केली आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात याच काळात कंपनीने भारतीय बाजारपेठेत 1,40,645 युनिटसची विक्री केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.