Share Market : गुरुवारी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक मर्यादेत व्यवहार करत आहेत. सकाळी सध्या, सेन्सेक्स 128.87 अंक किंवा 0.18 टक्क्यांच्या कमजोरीसह 72,173.28 वर व्यापार करत आहे आणि निफ्टी 68.90 अंक किंवा 0.31 टक्क्यांच्या घसरणीसह 21,882.25 वर व्यापार करत आहे. बाजार उघडताच, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक आणि भारती एअरटेल निफ्टीवर वाढीसह व्यवहार करत होते.
तर बजाज ऑटो, टाटा कंझ्युमर, टीसीएस, इन्फोसिस आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज घसरण होत असल्याचे दिसले. सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक1.25 % उसळी उसळी घेतली तर बजाज ऑटोला सर्वाधिक तोटा झाला. गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात गौतम अदानी समूहाच्या पाच लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये दिसले. तर पाच शेअर्स ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होते. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती तर अदानी विल्मरचे शेअर्स 1.31 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.
बुधवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद
काल 28 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 790 अंकांनी घसरला. निफ्टी निर्देशांक 22,000 च्या खाली गेला आहे. त्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 6.24 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 790.34 अंकांनी किंवा 1.08% घसरून 72,304.88 वर बंद झाला.
त्याच वेळी, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 247.20 अंकांनी किंवा 1.11% टक्क्यांनी घसरला आणि 21,951.15 च्या पातळीवर बंद झाला. एक्सचेंजमध्ये काल ल एकूण 3,921 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 880 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,963 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 78 समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले.