प्रसिद्ध कॉमेडीयन नवीन प्रभाकर दिसणार ‘या’ भूमिकेत

प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरलेली सोनी सबवरील मालिका ‘जिजाजी छत पर हैं’ पुन्‍हा एकदा इलायची (हिबा नवाब) आणि पंचमच्‍या (निखिल खुराणा) प्रेमकथेमध्‍ये आणखी एक नवीन वळण घेऊन येत आहे. आपल्‍या विनोदीशैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करणारा लोकप्रिय कॉमेडीयन नवीन प्रभाकर ‘जिजाजी छत पर हैं’मध्‍ये गेंडालालच्‍या भूमिकेत दिसणार आहे.

एक प्रख्‍यात अभिनेता गेंडालाल मुरारीच्‍या दुकानामध्‍ये येतो. इलायची त्‍याला महागडा लेहंगा मोफत देण्‍याचे मंजूर करते. पण त्‍यासाठी त्‍याने तिच्‍या नवीन कल्‍पनेला पाठिंबा दिला पाहिजे. इलायची मुरारीला या विचारामध्‍ये अडकवण्‍याची योजना आखते की, मुरारीला वाटले पाहिजे गेंडालाल हेच पंचमचे श्रीमंत, पण निराश वडिल आहे, जे त्‍याच्‍या मुलासोबत पुन्‍हा एकत्र येण्‍यासाठी काहीही करण्‍यास तयार आहेत. गेंडालाल मुरारीसोबत वेळ व्‍यतित करायला सुरूवात करतो. लवकरच गेंडालाल पंचमच्‍या इलायचीसोबतच्‍या विवाहाचा विषय काढतो.

नवीन प्रभाकर (गेंडालाल) म्‍हणाले, ”लोकांना हसवणे व त्‍यांचे मनोरंजन करणे ही माझी आवड आहे. मी पंचमच्‍या खोट्या वडिलांच्‍या भूमिकेत दिसणार आहे. तो मुरारीला फसवून पंचमचा इलायचीसोबत विवाह करण्‍याची मागणी करणार आहे. मी एका अनोख्‍या अवतारात ‘जिजाजी छत पर हैं’सारख्‍या लोकप्रिय मालिकेचा भाग असण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. मी आशा करतो की, प्रेक्षकांना पटकथेतील हा नवीन ट्विस्‍ट आवडेल. गेंडालाल पंचम-इलायचीच्‍या प्रेमकथेला आकार देण्‍यासाठी सज्‍ज आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.