#IPL2019 : डेव्हिड विलीची आयपीएलमधून माघार

चेन्नई -चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विली याने वैयक्‍तिक कारणास्तव संघातून माघार घेतली आहे. यॉर्कशायर कौंटी क्रिकेट क्‍लब वेबसाइटशी बोलताना डेव्हिडने सांगितले की, माझे दुर्भाग्य आहे. मला वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. माझी पत्नी दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार आहे. तिची प्रकृती स्थिर नसल्याने मला तिथे असणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे मी संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच तो पुढे म्हणाला, चेन्नई संघाने मला खूप मदत केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे माघार घेणे कठीण होते पण हाच योग्य निर्णय आहे. डेव्हिड विली पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज लुंगी एनगिडी जखमी झाल्याने संघातून बाहेर आहे. एनगिडीच्या जागी न्युझीलंडचा युवा जलदगती गोलंदाज स्कॉट कुगलेजिनला संघात स्थान दिले गेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.