मुंबई -महाराष्ट्रात सलग पाचव्या दिवशी करोनाबाधितांच्या संख्येत 2 हजारांची भर पडली. राज्यात गुरूवारी आणखी 2 हजार 345 बाधित आढळले. त्यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्यांची राज्यातील संख्या 41 हजारांपुढे गेली आहे.
महाराष्ट्रात 17 मे यादिवशी 2 हजार 347 बाधित आढळले. राज्याचा तो एकाच दिवसातील उच्चांक ठरला. राज्यातील करोनाबाधितांमध्ये अवघ्या 5 दिवसांत 10 हजारांहून अधिक संख्येची भर पडली आहे.
राज्यात सर्वांधिक करोनाबाधितांची नोंद मुंबईत झाली आहे. त्या शहरात 25 हजार 500 जणांना त्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, राज्यात एका दिवसात करोनामुक्त झालेल्या 1 हजार 408 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात करोनाने राज्यात आणखी 64 बाधितांचा बळी घेतला.